Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बालविकास प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षकांना मिळणार प्रशिक्षण

download 12

जळगाव (प्रतिनिधी ) जिल्ह्यातील ३६४० अंगणवाडी कर्मचारींना स्मार्ट फोन देण्यात आला असुन त्याद्वारे सर्व माहिती आणि दैनंदिन अहवाल हा ऑनलाईन भरावा लागणार आहे. यामुळे गरोदर माता आणि बालकांचे लसिकरण याची माहिती तात्काळ जिल्हा मुख्यालयाला मिळू शकणार आहे.यासाठी ३ मे पासुन जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून बालविकास प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

 

आज सर्वच क्षेत्रात ऑनलाईन कामकाजाची सुरुवात झाली आहे. पूर्वी संगणकावर काम करून त्याचा ई-मेल पाठवून ऑनलाईन काम केले जात होते. परंतु आता संगणक आणि लॅपटॉपवरून थेट मोबाईलवर ऑनलाईन कामकाज आले आहे. त्यात आता अंगणवाडी देखील सुटलेल्या नाहीत. त्यामुळे अंगणवाडी बाईला आता स्मार्टफोन हातात घेवून कामकाज करावे लागणार आहे. जिल्ह्यात त्यासाठी ३६४० स्मार्ट फोन वाटप करण्यात आले असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रफीक तडवी यांनी दिली.अंगणवाडी सेविकांना गरोदर माता, बालकांचे वजन, लसिकरण, पुरक आहार यासह इतर बाबींची कामे असतात. या सर्व कामांचा अहवाल त्यांना केंद्र किंवा तालुकास्तरावर द्यावा लागत असतो. त्यासाठी आता स्मार्ट फोनची मदत होणार असुन तीन महिन्यासाठी रिचार्जसाठी ४०० रूपये प्रमाणे अनुदान दिले जाणार आहे. जि.पत हे अनुदान प्राप्त झाले आहे. येत्या ३ मे पासुन जिल्हास्तरावर व त्यानंतर तालुकास्तरावर प्रशिक्षण होणार आहे.

Exit mobile version