Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चिखली येथील तरुणावर चाकूहल्ला

chaku halla

जळगाव प्रतिनिधी । किरकोळ कारणावरून तरुणावर एका वयोवृद्ध व्यक्तीने अचानकरित्या चाकूहल्ला करून जखमी केल्याची घटना आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास यावल तालुक्यातील चिखली येथे घडली. जखमी तरूणाला जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, अनिल राजेंद्र पाटील वय 22 रा. चिखली ता. यावल या तरूणाची गावातील चौकात चहाची टपरी आहे. आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास गावातील 61 वर्षीय व्यक्तीसोबत त्याचा वाद झाला. दरम्यान अचानकपणे त्यावृध्दाने चाकू हल्ला करत अनिल पाटील याला गंभीर जखमी केले. त्याला तातडीने किनगाव येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. येथील वैद्यकिय अधिकारी यांनी जळगावात जाण्याचा सल्ला दिला. नातेवाईकांनी तातडीने रूग्णास तातडीने जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. यावेळी नातेवाईकांची जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात मोठ्या संख्येने गर्दी जमली होती.

Exit mobile version