मुख्यमंत्र्यांचा मुक्ताईनगरातील दौरा ऐतीहासिक होणार : ना. गुलाबराव पाटील

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | मुख्यमंत्री बनल्यानंतर एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच जिल्ह्यात येत असून मुक्ताईनगराच्या त्यांच्या उपस्थितीत आयोजीत करण्यात आलेली सभा ही ऐतीहासिक ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

एकनाथ शिंदे यांच्या दौर्‍याच्या नियोजनासाठी आज शिंदे गटाची अजिंठा शासकीय विश्रामगृहात आयोजीत करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. दरम्यान, याच दौर्‍यात जिल्ह्यासाठी महत्वाच्या तसेच जनहिताच्या अनेक महत्वाच्या घोषणा करण्यात येतील असा आशावाद देखील ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवार दिनांक २० सप्टेंबर रोजी जळगाव जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍यात ते पाळधी येथे शासकीय विश्रामगृहाचे लोकार्पण करणार असून नंतर त्यांच्या उपस्थितीत मुक्ताईनगरात पक्षाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दौर्‍याच्या नियोजनासाठी आज अजिंठा शासकीय विश्रामगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ना. गुलाबराव पाटील तर प्रमुख उपस्थितांमध्ये आमदार चिमणराव पाटील आणि आमदार किशोरआप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीच्या प्रारंभी धरणगावचे माजी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र महाजन आणि माजी जि.प. सदस्य तथा उपजिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यानंतर पक्षाच्या नेतेपदी ना. गुलाबराव पाटील तर उपनेतेपदी आ. चिमणराव पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. आ. किशोरआप्पा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याची माहिती देऊन आपल्या मतदारसंघातून हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. आमदार चिमणराव पाटील यांनी या दौर्‍यासाठी कार्यकर्त्यांनी जागरूक राहण्याचे आवाहन केले. आपल्या मतदारसंघातूनही मोठ्या संख्येने कार्यकर्ते सभेला उपस्थित राहणार असल्याचे ते म्हणाले.

ना. गुलाबराव पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच जिल्ह्यात येत असल्याने त्यांची सभा ऐतीहासीक व्हावी यासाठी सुक्ष्म नियोजन करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, प्रत्येकाने आपल्या सहकार्‍यांना याबाबत सांगून सभेला यावे. एकनाथ शिंदे यांचा दौरा हा पक्षाला बळकटी देण्यासाठी उपयुक्त ठरणारा असून यात काही महत्वाच्या घोषणा होण्याची शक्यता असल्याचे सूतोवाच देखील ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

या बैठकीला माजी जि.प. सदस्य पवन सोनवणे, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, माजी पंचायत समिती सभापती मुकुंदराव नन्नवरे, डॉ. कमलाकर पाटील, बाजार समिती माजी सभापती कैलास चौधरी, संचालक अनिल भोळे, धोंडू जगताप, मोतीआप्पा पाटील, सचिन पाटील, ज्ञानेश्‍वर चौधरी, रवी कापडणे; नगरसेवक दिलीप पोकळे, मनोज चौधरी, गणेश सोनवणे, चेतन सनकत, नवनाथ दारकुंडे, कुंदन काळे, गजानन देशमुख, ज्योतीताई चव्हाण, आशुतोष पाटील, सरिताताई कोल्हे., शोभाताई चौधरी, सिंधूताई कोल्हे, ज्योतीताई शिवदे, भारती रंधे, ज्योतीताई चव्हाण, दिनेश जगताप, शाम कोगटा, निलेश पाटील, जितेंद्र गवळी, युवासेनेचे शंतनू नारखेडे, स्वप्नील परदेशी, सचिन शिवदे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन राजेंद्र चव्हाण यांनी केले.

Protected Content