Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुख्यमंत्र्यांची कालची सभा; मास्टर नव्हे तर लाफ्टर – देवेंद्र फडणवीस

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कालच्या सभेत संपूर्ण भाषण संपेपर्यंत लाफ्टर सुरू असल्याचे सांगत ही मास्टर सभा नाही, तर लाफ्टर सभा असल्याची टीका त्यांनी केली.

गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये भाजपच्या हिंदी भाषिक संकल्प संमेलनात आज रविवार, दि.१५ मे रोजी फडणवीस यांनी भाषण केले. त्यापूर्वी मंचावरील नेत्यांनी आणि सभेला उपस्थित लोकांनी सामूहिक हनुमान चालीसा पठण केलं. या सभेस विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

यावेळी विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेतील टीकेला उत्तर देताना, ”अयोध्याच्या आंदोलनात तुमचा एकही नेता नव्हता, हे म्हटल्यावर किती मिरची लागली.” अभिनेता गोविंदा याच्या चित्रपटातील गाण्याच्या अंदाजात उद्धव ठाकरे यांना टोमणा मारत ते म्हणाले, ”मैं तो अयोध्या जा रहा था, मैं तो मस्जिद गिरा रहा था, तुझ को मिर्ची लगी तो में क्या करू.” ते म्हणाले, ”हो मी गेलो होतो बाबरी पडायला, याचा मला अभिमान आहे. असे म्हणत मी अयोध्येला मशीद पडायला गेलो होतो तर तुम्ही सहलीला गेले होते.”  असं वक्तव्य करत पुढे हाच देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेचा ढाचा पाडणार, असे मुख्यमंत्री ठाकरे यांना उद्देशून ते म्हणाले.

Exit mobile version