Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मनसेच्या निवेदनाची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल ; ४२ कोटींच्या निधीच्या चौकशीचे आश्वासन

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राज्य शासनाने जळगाव महापालिकेला रस्त्यांसाठी ४२ कोटींचा  निधी दिला होता. या निधीची चौकशी करण्यात यावी अशा मागणीचे पत्र मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना ते जिल्हा दौऱ्यावर आले असता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे देण्यात आले होते. याची दखल घेऊन जळगाव मनपाला या निधीचे चौकशीचे पत्र मुख्यमंत्री कार्यालयातून  पाठविण्यात आले असल्याची माहिती मनसे उप महानगराध्यक्ष आशिष सपकाळे यांनी कळविली आहे.

 

 

मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे हे जिल्हा दौऱ्यावर आले असता महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहरतर्फे त्यांना दि. २० सप्टेंबर  रोजी   ४२ कोटी रस्त्यांच्या निधीची चौकशी व्हावी ह्या संदर्भात मुख्यमंत्री  निवेदन देण्यात आलं होतं. ,त्या अनुषंगाने दि. २७ सप्टेंबर  रोजी  मुख्यमंत्री कार्यालय येथून निवेदनाचा उत्तर मनसेला आलेलं आहे. त्यात आपल्या निवेदनाची दखल घेतली गेलेली असून, त्या ४२  कोटी संदर्भातील चौकशी पत्र सी एम ओ ऑफिस मुंबई येथून जळगाव महानगरपालिका या ठिकाणी रवाना झालेला आहे.  मला सांगण्यात अति आनंद होत आहे कि, आपल्या निवेदनाची दखल  मुख्यमंत्री यांनी घेतली असून त्याच्यावर लवकरच अंमलबजावणी होईन् चौकशी होईल, अशी ग्वाही देण्यात आले असल्याचे उप महानगराध्यक्ष  आशिष सपकाळे यांनी कळविले आहे.

Exit mobile version