Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

छगन भुजबळांकडून शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाची खुली ऑफर

Chaggab Bhujbal 696x364

 

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेने भाजपासोबत राहून उपमुख्यमंत्रिपद घ्यायचं का आमच्या सोबत येऊन मुख्यमंत्रिपद घ्यायचं हे आता शिवसेनेनेच ठरवावे, असे सूचक वक्तव्य करत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाची खुली ऑफर दिली आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेला खुली ऑफर देत भाजपासोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपद घेणार का आपल्यासोबत येऊन मुख्यमंत्रिपद घेणार असे म्हटले आहे. शिवसेनेने भाजपासोबत राहून उपमुख्यमंत्रिपद घ्यायचं का आमच्या सोबत येऊन मुख्यमंत्रिपद घ्यायचं हे आता शिवसेनेनेच ठरवावं, असे देखील भुजबळ यांनी नमूद केले आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल आता लागले आहेत. त्यातच आता मुख्यमंत्री कोणाचा हा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. मुख्यमंत्रिपदासाठीही आता रस्सीखेच सुरू झाली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी निकालानंतर पत्रकार परिषद घेतली. जागावाटपाच्या वेळी वाटाघाटी केल्या परंतु आता प्रत्येक वेळी अडचण समजून घेणार नसल्याचे सांगत अप्रत्यक्षरित्या उद्धव यांनी भाजपाला इशारा दिला आहे.

Exit mobile version