Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विवाहाच्या नावाखाली तरुणाची फसवणूक; नवविवाहितेने काढला पळ

यावल प्रतिनिधी । येथील एका शेतमजुरी करणार्‍या तरुणाची लग्न लावण्याच्या नावाखाली फसवणुक झाल्याचा प्रकार समोर आला. दरम्यान लग्न झालेली नवविवाहीत तरूणीने आपल्या सासरवाडीतुन पळ काढल्याने त्या तरूणाने फसवणुक झाल्याची तक्रार पोलीसात दिली आहे. 

या सदंर्भात मिळालेली माहीती अशी की डिंगबर देविदास फेगडे (वय ३० वर्ष रा.महाजन गल्ली यावल) यांनी यावल पोलीसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अकलुद तालुका यावल येथील राहणारे साहेबराव कोळी आणी अनिल परदेशी यांनी व बहीणाबाई रावसाहेब अंबुरेरा (राहणार दर्गा रोड परभणी) यांनी जालना येथील राहणार्‍या एका गरीब कुटुंबातील तरूणीशी विवाह लावुन देण्याच्या नावाखाली आपली फसवणुक केली आहे.

यात म्हटले आहे की, दि.७ नोव्हेंबर २०२० रोजी यावल येथील विठ्ठल मंदीरात हिन्दु रितीरिवाजा प्रमाणे आपला जालना येथे राहणारी तरुणी सोनाली कुर्‍हाडे हिच्याशी विवाह लाऊन देण्यात आला होता. मात्र दिनांक १२ / ११ / २० रोजी घरात एकटी असलेल्या सोनाली कुर्‍हाडे हिने घराचा दरवाजा बंद करून चाबी शेजार्‍या दिली व मी मंदीरात जावुन येतेअसे सांगुन अंगावरील २५ हजार रुपये किमतीचे दागिने व ५ हजार रुपयांच्या साडया व मोबाईल घेवुन गेली. ती उशीरापर्यंत न आल्याने अखेर लग्न लावणार्‍या साहेबराव कोळी यांच्याशी मोबाईलवर सोनाली संदर्भात विचारणा केली असता कोळी यांनी आपण तुझे लग्न लावुन दिले आहे सोनाली बहीणाबाई यांना आपण ओळखत नसल्याचे सांगून अंग झटकण्याचा प्रयत्न केला. यामुळे आपली लग्न लावुन देण्याच्या नांवाखाली सुमारे एक लाख रुपयात फसवणुक झाल्याचे आपल्या निदर्शनास आल्याने या चारही जणा विरुद्ध यावल पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

Exit mobile version