मंजूरीत जागेतच स्वस्त धान्य वितरण करावे – हरिभाऊ पाटलांची मागणी

पाचोरा प्रतिनिधी । शहरातील जामनेर रोडवरील श्रीराम नगर येथे स्वस्त धान्य दुकान ज्या क्षेत्रासाठी मंजूर केले आहे, त्याच भागात धान्य वितरण करण्यात यावे, अशी मागणी बल्लाळेश्वर युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ पाटील यांनी तहसीलदार कैलास चावडे यांच्याकडे केली आहे.

शहरातील श्रीरामनगर, श्रीकृष्ण नगर, सिंधी कॉलोनी या भागासाठी सर्वज्ञ महीला बचत गटाला स्वस्त धान्य परवाना मंजुर करण्यात आला आहे. त्या सर्वज्ञ महिला बचट गटामार्फत धान्य पुरवठा देखील सुरळीत करण्यात येत होता. मंजुर परवान्यास ज्या भागासाठी आपण मंजुरी दिलेली आहे. त्याच भागात ते स्वस्त धान्य दुकान कार्यन्वित असावे, सर्वज्ञ महिला बचट गटाचे स्वस्त धान्य दुकान इतरत्र कोणत्याही भागात

धान्य वाटप करण्यासाठी परवान्यास मंजुरी देण्यात येवु नये, त्यामुळे आमच्या स्थानिक रहिवाश्यांना धान्य घेण्यासाठी सोईचे होईल अशाच ठिकाणी धान्य दुकान सुरळित सुरु ठेवण्यात यावे. आपण ते स्वस्त धान्य दुकान कोणत्याही भागात सुरु करण्याठी परवाना मंजुरी दिली तर त्यास आमची कायदेशीर हरकत आहे. यापुढे देखिल राहील आमच्या भागाचे स्वस्त धान्य दुकान आमच्याच श्रीराम नगर, श्रीकृष्ण नगर, सिंधी कॉलोनी भागात व परिसरातच सुरळीत सुरु ठेवण्यात यावे, अशी मागणी बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ पाटील यांनी निवेदनाद्वारे तहसिलदार कैलास चावडे यांच्याकडे केली आहे.

 

Protected Content