Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चव्हाण यांच्याकडून तेराशे जनावरांना चारापाणीची व्यवस्था (व्हिडीओ)

 

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील रोहिणी व पंचक्रोशीतील जवळपास 1300 जनावरांना गेल्या दोन महिन्यापासून चारापाण्याची व्यवस्था युवा उद्योजक मंगेश चव्हाण यांनी केली आहे.

याबाबत माहिती अशी की, मंगेश चव्हाण हे गेल्या दोन माहिन्यापासून तालुक्यातील 1300 जनावरांना चारापाण्याची सोय करत आहेत. चव्हाण यांनी जनावरांसाठी वेळेवर छावणीची व्यवस्था केली नसती तर कदाचित गुर विकण्याची वेळ आली असती. तसेच पेरणीच्या वेळी बैल उपलब्ध होऊ शकले नसते. मात्र सर्व गुरांच्या जीव वाचल्यामुळे पेरणी करण्यास मदत होईल. म्हणून सर्व शेतकरी बांधव्यांनी चव्हाण यांचे आभार मानत त्यांना भरभरुन आशिर्वाद दिला आहे.

Exit mobile version