Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तरुणीचे अपहरण करणाऱ्या सहा जणांवर गुन्हा दाखल

यावल प्रतिनिधी । सातपुडा पर्वताच्या कुशीत असलेल्या गाडऱ्या गावातील आदिवासी अल्पवयीन तरुणी तिच्या नियोजित पतीसह गावी जात असताना मध्यप्रदेशातील सहा जणांनी अपहरण करुन तिला पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की दि.९ जुलै रोजी फिर्यादी अल्पवयीन तरूणी ही वाघझीरा तालुका यावल येथील चुलत बहीणीस भेटायला आलेली होती. (दि.१२ जुलै) रोजी ही तरुणी आपल्या नियोजीत पती रवी हुकाऱ्या बारेला (रा.वाघझीरा तालुका यावल) व याच्या सोबत चुलत भाऊ गणदास खुशाल बारेला आपल्या गाडऱ्या गावी चुलत भाऊच्या मोटरसायकलवरून जात असतांना दुपारी १२ वाजेच्या सुमारास लंगडाआंबा गावापासुन सुमारे एक किलोमिटर अंतरावर दोन मोटरसायकली समोर लावल्याच्या दिसुन आल्यात त्यामुळे तरुणीच्या नियोजीत पती रवी बारेला यांने त्याच्या ताब्यातील मोटरसायकल हळु केली.

जंगलातील झाडाच्या पाठीमागुन जागीराम गुलाब बारेला, नेमसिंग जागीराम बारेला, अनेरसिंग गुलाब बारेला, नितेश जागीराम बारेला, शांताराम गुलाब बारेला सर्व राहणार पलासकोट तालुका भगवानपुरा जिल्हा खरगोन मध्यप्रदेश ह. मु. गाडऱ्या तालुका यावल आणी मंसाराम मददास बारेला राहणार वालपानी तालुका भगवानपुरा जिल्हा खरगोन मध्यप्रदेश या सर्वांनी मिळुन तरुणीच्या नियोजीत पती रवी बारेला आणी चुलत भाऊ गणदास बारेला यांना रस्त्यात अडवुन दोघांना लाथाबुक्याने व काठ्यांनी मारहाण केली. यातील नितेश जागीराम बारेला याने त्या अल्पवयीन तरुणीस तुझ्या चुलत भावाला आणी कुटुंबास जिवे ठार मारण्याची धमकी देवुन आपल्या सोबत प्रथम ढोलगा या गावी व नंतर मोटरसायकलवर बसवुन आपल्या सोबत वालपानी व नंतर सुतपुरी मध्यप्रदेश या गावी घेवुन गेले. दरम्यान अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा चुलत भाऊ गणदास बारेला हा तरूणीचा शोध घेत भगवानपुरा पोलीस स्टेशन येथे पहोचला त्यांनी दिलेल्या माहीतीच्या आधारवर पोलीसांनी अल्पवयीन तरुणी शोध घेतले व त्या तरुणीस पोलीस स्टेशनमध्ये बोलवुन तरूणीने दिलेल्या जबाबात नितेश बारेला यांने पळवुन आणले नसल्याचे सांगीतले. 

दरम्यान यावल पोलीस स्टेशनला दि.२० जुलै रोजी अल्पवयीन तरुणीने दिलेला आपला यावेळी फिरवल्याने अखेर तरूणीने दिलेल्या फिर्यादीवरून मध्यप्रदेशातील रहीवाशी सर्व सहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन, गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अजमल पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अमलदार संजय तायडे व युनुस तडवी हे करीत आहे. दरम्यान त्या अल्पवयीन तरुणीस पोलीसांनी त्याच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले असुन अपहरण करुन पळवुन नेलेल्या संशयीत तरुण नितेश बारेला या तरूणाचे या तरूणीवर प्रेम असल्याचे कळते.

 

Exit mobile version