Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चार महिला आमदारांची आर्थिक फसवणूक : गुन्हा दाखल

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातल्या चार महिला आमदारांची फसवणूक करत त्यांच्याकडून पैसे उकळल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, आमदार माधुरी मिसाळ, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे या राज्यातील चार महिला आमदारांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली आई आजारी असल्याचा बहाणा करत एका अज्ञात व्यक्तीने या महिला आमदारांना मदत मागितली होती. वर नमूद केलेल्या चौघा महिला आमदारांनी मदत म्हणून ती रक्कम ऑनलाइन माध्यमातून देण्यात आली होती.

मात्र तो फेक कॉल असल्याचे लक्षात आल्यानंतर आमदारांनी तक्रार दिली होती. या अनुषंगाने पुण्यातील बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुकेश राठोड असे आरोपीचे नाव असून आता त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

Exit mobile version