Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘चांगुलपणाची चळवळ’ या गृपच्या माध्यमातून पुरग्रस्तांसाठी ‘संकलन शिबीर’

chalval

 

जळगाव प्रतिनिधी । पुणे, कोल्हापूर व सांगलीमध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. 4 ते 5 दिवसांपासून दोन्ही जिल्हे पुराच्या पाण्याने बुडले असून या निसर्गाच्या कोपामुळे हजारों लोक बेघर झाले आहेत. या लोकांना आधाराची गरज लक्षात घेत मानवी हक्क आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर मुळे यांनी केलेल्या ‘चांगुलपणाची चळवळ’ या गृपच्या माध्यमातून येत्या रविवारी दि.11 ऑगस्ट रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 5 पर्यंत फर्ग्युसन महाविद्यालयात हे ‘संकलन शिबिर’ आयोजित करण्यात येत आहे.

संकलन शिबीरात या वस्तू जमा करणार
पुण्यातून या शिबीरात वस्तू गोळा करून कोल्हापूर येथील पुरग्रस्तांना तातडीने पाठविण्यात येणार आहे. यामध्ये बिस्कीट पुडे, डाळी, साखर, तेल, बॅटरी, मेणबत्त्या, माचिस बॉक्स, टूथब्रश, पेस्ट, फूड प्लेट्स, साबण ब्लँकेट्स, शाल, बेडशीट, मच्छरदाणी, मच्छर कॉईल, कासवछाप वगैरे पॅकिंग असलेले फूड पॅकेट्स ओआरएस पॅकेट्स, इन्स्टंट फूड पॅकेट, चांगले कपडे (फाटके,बटन नसलेले नाही) लहान मुलांचे कपडे (उबदार असल्यास उत्तम), महिलांना मुलींना लागणारे कपडे सॅनिटरी नॅपकिन व धान्य (तांदूळ,डाळ,साखर) इत्यादी वस्तू या ग्रुपच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे.

गरजुंना देणार ही मदत

पुण्यातील तरुणांच्या ग्रुप माध्यमातून राज देशमुख आणि मित्रपरिवार यांच्यावतीने दरवर्षी संकलन मोहीम राबवली जाते. यामध्ये जुने-नवे कपडे, खेळणी, भांडी, पुस्तके, गरम कपडे, इतर उपयुक्त वस्तू आणि जिवनावश्यक वस्तू जमा करून अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रम यांना देतो. २००९ पासून दरवर्षी हा उपक्रम राबविला येत आहे. हा उपक्रम गेले १० वर्षे अविरत चालू आहे. अनेक जुन्या आणि नवीन वस्तू गोळा करून त्या गरजू संस्थाना याचे वाटप करण्यात येते. मागील वर्षी महाराष्ट्रातील भीषण दुष्काळग्रस्त परिस्थिती पाहता, शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी यावर्षी धान्य कलेक्शन कॅम्प आयोजित केला होता. पुण्यातील विविध परिसरातील व्यक्ती दरवर्षी आपल्याकडील वस्तू घेऊन येतात. आमच्या माध्यमातून गरजूंना मदत करतात.

ग्रुपच्या माध्यमातून आवाहन
यात आपलेच बांधव सांगली कोल्हापुरात अडकले आहेत. त्यांना थोडे सहकार्य करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. जागृती ग्रुपच्या वतीने आवाहन करतो. तसेच सर्व पुणेकरांनी आम्हांला या उपक्रमात सहकार्य करावे. यासाठी ११ ऑगस्टला रविवारी, सकाळी ७ ते ५ पर्यंत फर्ग्युसन महाविद्यालय, मेन गेट येथे ही मोहीम राबवण्यात येणार आहे. या संकलन मोहिमेत सहभागी होऊन तुम्ही पूरग्रस्तांना मदत करू शकता.

अधिक माहितीसाठी संपर्क
मनीषा- 8208802776
डॉ.उमाकांत-8087589247

Exit mobile version