स्वयंचलित हवामान यंत्राच्या जागेत होणार बदल – आमदारांनी केली पाहणी

यावल प्रतिनिधी | यावल तालुक्यातील हवामान यंत्रणा सदोष असल्याने केळी उत्पादक शेतकरी पिकविम्याच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी स्वयंचलित हवामान यंत्र नवीन जागी स्थलांतरित करण्याच्या सूचना आमदार शिरीष चौधरी यांनी ‘स्कायमेट कंपनी’च्या प्रतिनिधींना दिल्या आहेत.

गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणावर थंडीचं वातावरण होतं. मात्र यावल तालुक्यात पीक विम्याच्या संदर्भात लावण्यात आलेलं हवामान यंत्र हे सदोष असल्यामुळे त्यात कमी तापमानाची नोंद झाली नाही. परिणामी तालुक्यातील मोठया प्रमाणातील केळी उत्पादक शेतकरी पिक विम्यापासून वंचित राहिले.

आणि या संदर्भातील तक्रारी यावल/रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्याकडे शेतकऱ्यांनी केल्या. यासंदर्भात मंगळवारी आमदार शिरीषदादा चौधरी, खासदार रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे जळगावला बैठक पार पडली.

या बैठकीमध्ये ‘स्वयंचलित हवामान यंत्र’ ज्या स्कायमेट कंपनीने बसवली आहेत. ती नागरी वस्तीत आहे. परिणामी शेती क्षेत्र आणि नागरी वस्तीतील तापमानामध्ये सतत तफावत असल्यामुळे शेतकरी या विम्यापासून वंचित राहात असल्याची तक्रार याठिकाणी करण्यात आली.

बुधवार, दि.१२ जानेवारी रोजी कंपनीचे प्रतिनिधी तालुक्यात दाखल झाले. आमदार शिरीषदादा चौधरी, जिल्हा परिषद काँग्रेसचे गटनेता प्रभाकर सोनवणे, पंचायत समितीचे गटनेता शेखर पाटील, मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद महाजन, बामणोदचे सरपंच राहूल तायडे, माजी पंचायत समिती सदस्य विलास तायडे, योगेश पाटील, प्रीतम राणे, सांगवी बुद्रुकचे सरपंच रशिद तडवी, उपसरपंच विकास धांडे , न्हावी सरपंच भारती नितीन चौधरी, पंचायत समिती सदस्य सरफराज सिकंदर तडवी, माजी पंचायत समिती सदस्य भालचंद्र भंगाळे, बामणोदचे उपसरपंच तुषार जावळे, माजी पंचायत समिती सदस्य विलास तायडे, विकासोचे चेअरमन प्रमोद बोरले, डोंगर कठोरा सरपंच नवाज तडवी, प्रभाकर झोपे, उपसरपंच योगेश पाटील, दक्षता समिती सदस्य भोजराज पाटील, डॉक्टर राजेंद्र झांबरे, मोहराळे सरपंच नंदा महाजन, उपसरपंच जहांगीर तडवी, मसाका संचालक राजेंद्र महाजन, माजी सरपंच वासुदेव पाटील, भरत महाजन, जनार्दन पाटील, श्यामकांत पाटील, मारूळचे जावेद जनाब, जिया सर, सरपंच असद सैयद जावेद, इखलास खान, बाळू अडकमोल, चांद भाई, तहसीलदार महेश पवार, कृषी अधिकारी अजय खैरनार, श्री.शेगोकार, कृषी अधिकारी श्री.कोल्हे, स्कायमेट विमा कंपनीचे प्रतिनिधी नितीन पाटील यांच्यासमवेत शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये तालुक्यातील न्हावी, फैजपूर, यावल, बामणोद या महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान यंत्र शेती क्षेत्रात कोणत्या ठिकाणी बसवण्यात योग्य असतील या संदर्भातील जागा पाहणी करण्यात आली.

‘येत्या दहा दिवसाच्या आत नवीन ठिकाणी स्वयंचलित हवामान यंत्र स्थलांतरित करावे. आगामी काळात थंडी अजून दीड महिना आहे. या पुढील काळात तापमान अधिक खालावले तर शेतकरी पुन्हा लाभापासून वंचित राहू नये’ यासाठी दक्षता स्वयंचलित हवामान यंत्र कंपनीने घ्याव्यात अशा सूचना आमदार शिरीष चौधरी यांनी स्कायमेट कंपनीच्या प्रतिनिधींना दिल्या.

Protected Content