Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विसर्जनाच्या दिवशी शहरातील वाहतूक मार्गात बदल; अशी होईल वाहतूक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यात सर्वत्र गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. ९ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन होणार असून या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीस अडथळा निर्माण होवू नये शहर वाहतूक शाखेतर्फे शहातील इच्छादेवी चौका ते शिरसोली रोडसह विविध मार्गावरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहे, अशी माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक लिलाधर कानडे यांनी बुधवार, ७ सप्टेंबर रोजी प्रसिध्दीसाठी दिली आहे.

जळगाव शहरातील सार्वजनिक गणेश मंडळ तसेच घरगुती गणपतींचे मेहरुण तलाव येथे विसर्जन केले जाते. ९ सप्टेंबर रोजी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत सार्वजनिक मंडळाच्या विसर्जन मिरवणुका ह्या ला.ना.चौक, कोर्ट चौक, गोविंदा रिक्षा स्टॉप, घाणेकर चौक, भिलपुरा चौक, बालाजीमंदिर, रथ चौक, सराफ बाजार, नेताजी सुभाष चंद्र बोस चौक, बेंडाळे चौक मार्गाने मेहरुण तलाव येथे जातील. यामुळे या मिरवणुक मार्गावर तसेच या मार्गास मिळणारे सर्व उपरस्ते व गल्ल्यांमधून सर्व प्रकारचे वाहनांना प्रवेश बंद राहणाार आहे.

तसेच असोदा भादलीकडून जळगाकडे येणाऱ्या व जाणाऱ्या एस.टी.बसेस व इतर वाहने विसर्जनाच्या दिवशी मोहन टॉकीज, गजानन मालसुरे नगर, जुने जळगाव, लक्ष्मीनगर, कालिंका माता मंदिर मार्गे, अजिंठा चौक, आकाशवाणी चौक, नवीन बसस्टॅन्ड या मार्गाचा वापर करतील.

चोपडा, यावल, विदगाव, शिवाजीनगर कडून मिरवणुक मार्गाने येणारी वाहने शिवाजीनगर , दूध फेडरेशन, जुनी फॅक्टरी, गुजराल पेट्रोलपंप, आकाशवाणी चौक, नवीन बसस्टॅन्ड या मार्गे जातील व येतील.

तसेच पाचोरा कडून जळगावकडे जाणारी वाहने आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक, डीमार्ट, मोहाडी रोड वाय पॉईंट, मलंगशहा बाबा दर्गा मार्गे पाचोरोकडे जातील. तर पाचोराकडून जळगावकडे येणाऱी वाहने पाचोरा, वावदडा, नेरीमार्गे, अजिंठा चौफुली व जळगाव या मार्गाचा वापर करतील. पाचोराकडून येणारी कार तसेच दुचाकी व हलके वाहनांकरीता मलंगशहा बाबा दर्गा, गुरुपेट्रोलपंप, राजे संभाजी चौक, संत गाडगेबाबा चौक, महाबळ चौक, काव्यरत्नावली चौक, आकाशवाणी चौक मार्गे जळगाव शहरात येतील अशी माहिती शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरिक्षक लीलाधर कानडे यांनी दिली आहे.

Exit mobile version