Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचा चेंज रिपोर्ट धर्मदाय आयुक्तांनी फेटाळला

जामनेर प्रतिनिधी | जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचा २००३ ते २००८ साठी संचालक मंडळ चेंज रिपोर्ट करीता सन २००४ मध्ये दिवंगत आबाजी नाना पाटील यांनी केलेला अर्ज क्रमांक ६१४/२००४ धर्मदाय आयुक्त जळगाव यांनी फेटाळला आहे. यामुळे संस्थेतील संचालक मंडळाबाबत पुन्हा एकदा संदिग्धता निर्माण झाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीमध्ये संचालक मंडळ अधिकृत कोण याबाबत बर्‍याच वर्षापासून वाद असून १९९९ पासून संस्थेचे चेंज रिपोर्ट प्रलंबित असल्याने संस्थेचे खरे हक्कदार कोण हे प्रश्न चिन्ह कायम आहे. प्रशासकीय लढाई सुरु असताना १९९९ ते २००३ या काळात दिवंगत आबाजी नाना पाटील व नारायण चौधरी यांनी अध्यक्ष व सचिव म्हणुन काम पाहिले तर २००३ ते २००८ संचालक मंडळ निवडी वेळी मोठी उलथा पालथ होऊन अध्यक्ष दिवंगत आबाजी नाना पाटिल व सचिव सुरेश मनोहरलाल धारीवाल यांची निवड झाली. मागील चेंज रिपोर्ट ला मान्यता नसतांना तो कालावधी निघून गेला.

दरम्यान, पुन्हा २००४ साली दिवंगत अध्यक्ष आबाजी नाना पाटिल यांनी २००३ ते २००८ साठी नवीन संचालक मंडळ साठी चेंज रिपोर्ट दाखल केला होता. तो चेंज रिपोर्ट २१/०९/२०२१ रोजी धर्मदाय आयुक्त यांनी उच्च न्यायालय यांचेकडील २३७/०४/२०१७ रोजीच्या प्रलंबित चेंज रिपोर्ट निकाली काढण्याच्या आदेशाचा संदर्भ घेऊन दिलीप विठ्ठल महाजन यांचा तक्रारी अर्ज ग्राह्य धरून तो चेंज रिपोर्ट फेटाळून लावला.२०१५ पर्यंत सुप्त असणारा संचालक मंडळाचा वाद दिवंगत आबाजी नाना पाटिल ज्या वेळी अचानक धारीवाल गटाला सोडुन माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या गोटात सामील झाले तेव्हा त्याने वेगळं वळण घेऊन २०१८ साली दोन समांतर संचालक मंडळ काम पाहत आहे.

दरम्यान, आजची प्रेस नोट आमदार गिरीश महाजन गटाने पत्रकारांना दिली असली तरी दिवंगत आबाजी नाना पाटील यांचा बदल अर्ज फेटाळला असल्याने संपूर्ण शिक्षण क्षेत्रात संदिग्नता निर्माण झाली आहे.१९९९ते २००३ साठी असणार्‍या संचालक मंडळाचा२००० साली दाखल चेंज रिपोर्ट ३०/०१/२०१२१ रोजी या अगोदर फेटाळला गेला आहे. यामुळे संस्थेवरील हक्काबाबत संभ्रम कायम असल्याचे दिसून आले आहे.

Exit mobile version