चांगदेव ग्रामसेवकाला गटविकास अधिकाऱ्यांची पाठराखण

मुक्ताईनगर प्रतिनिधी । चांगदेव ग्रामसेवकाची मनमानी गट विकास अधिकारी यांचा सदर ग्रामसेवकाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की ग्रामसेवकाने 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हजर राहणे शासन नियमानुसार बंधनकारक असताना चांगदेव येथील ग्रामसेवक दुपारी 2 वाजेला ग्रामपंचायत मधून निघून जातात त्यामुळे चांगदेव गावातील ग्रामस्थ विकासापासून लांब आहेत. तसेच शासन नियमाप्रमाणे ग्रामसेवक ड्युटी करत असलेल्या गावी रूम घेऊन राहणे बंधनकारक असताना सदर ग्रामसेवक बाहेरगावाहून ये-जा करतात तसेच फोन लावल्यावर अरेरावीची भाषा करतात कालच एका लाभार्थ्याने गोठा प्रकरनात मंजुरीसाठी फाईल आणतो असे सांगितले. त्यावर सदर ग्रामसेवकाने मला गट विकास अधिकारी यांचेकडून पत्र आले आहे व सध्या गोठा फाईल बंद आहे, असे सांगितले शहानिशा करण्यासाठी सदर पत्र मागवली असता ते पत्र 2020 सालचे असून त्यावर पेनाने खोडून 31/ 5 /2021 तारीख टाकण्यात आली. या पत्राची शहानिशा करण्यासाठी गटविकास अधिकारी संतोष नागटीलक यांची भेट घेतली असता हे पत्र मी दिलेच नाही असे उत्तर दिले. या ग्रामसेवकाला तारीख खोडून चालू तारीख टाकण्याचा अधिकार दिला कोणी तसेच त्यांना ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक दुपारपर्यंत हजर राहत नाही सांगितले असता त्यांना काम असतात दोन- तीन गावांचा चार्ज असतो  असे सांगितले त्याची शहानिशा केली असता सदर ग्रामसेवककड़े फक्त चांगदेव गावाचा चार्ज आहे. 

तरीसुद्धा गटविकास अधिकारी सदर ग्रामसेवकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहे  त्यामुळे नक्की गोड बंगाल काय तसेच ग्रामसेवकाकड़े 2-3 गावाचा चार्ज असल्यास तशी पूर्वसूचना ग्रामपंचायतच्या नोटीस बोर्डवर लिहिणे बंधनकारक आहे जेणेकरून गावकऱ्यांना समजेल ग्रामसेवक हजर आहेत की नाही. तरी असे कुठले प्रकारची नोटीस वगैरे ग्रामसेवकाकडून  नोटीस बोर्ड वर लिहिले जात नाही. तरी या बाबत जिल्हा परिषद मुख्यअधिकारी यांनी लक्ष घालण्याची गरज चांगदेव  ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

Protected Content