Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चांद्रयान-२ चे काऊंटडाऊन सुरू : भारतीयांचे डोळे चंद्राकडे !

chandrayaan 2 201908289036

बेंगळुरू, वृत्तसंस्था | विज्ञान क्षेत्रातील ऐतिहासिक कामगिरीपासून भारत आता अवघे काही तास दूर आहे. आज रात्री १.३० वाजता भारताचे चांद्रयान चंद्रावर उतरणार असून त्याचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. त्यामुळे या ऐतिहासिक आणि अभूतपूर्व क्षणाची वाट पाहण्यासाठी देशासह जगभरातील कानाकोपऱ्यात असलेले भारतीय आतूर झाले आहेत.

 

चंद्रयान मोहिमेची क्षणचित्रे :-

चंद्राच्या ज्या कक्षेत आजवर कोणी गेले नाही, त्या ठिकाणी आपले चांद्रयान जाणार आहे. आमचा सॉफ्ट लँडिंगवर पूर्ण विश्वास असून आज रात्रीची आम्ही वाट         पाहत आहोत : इस्त्रो चेअरमन सिवन
भारतासाठी आजची रात्र ऐतिहासिक ; ‘विक्रम’ मध्यरात्रीनंतर चंद्रावर उतरणार…
मिशननुसारच विक्रम लँडर पुढे सरकत असल्याचे इस्त्रोच्या प्रमुखांनी सांगितले
चांद्रयान मोहिमेकडे १३० कोटी भारतीयांचे लक्ष लागले आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
हे मिशन यशस्वी झाल्यास चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरेल
लँडिंगनंतर पहाटे ५.०० ते ६.०० वाजेच्या दरम्यान हे रोव्हर प्रज्ञान रोल आऊट करेल
इस्रोच्या माहितीनुसार शनिवारी पहाटे १.३० ते २.३० च्या सुमारास चांद्रयान-२ विक्रम लॅडर चंद्राला स्पर्श करेल

Exit mobile version