Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुसळी येथे चंद्रशेखर अत्तरदे यांचा झंझावाती प्रचार दौरा

musali

जळगाव प्रतिनिधी । जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांचा मुसळी येथे आज (दि.१८) दुपारी १२ वाजता झंझावाती प्रचार दौरा मोठ्या उत्साहात पार पडला.

यावेळी गावातील महिलांनी जागोजागी चंद्रशेखर अत्तरदे व जि.प. सदस्या माधुरीताई अत्तरदे यांचे औक्षण करून फुलहार घालून स्वागत केले. याचबरोबर गावातील नागरिकांकडून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या प्रचार रॅलीप्रसंगी गावातील सरपंच, ग्रा.पं. सदस्य, प्रमुख पदाधिकारी, गटातील शक्ति प्रमुख सुनील पाटील, शालिक तायडे, राजू बडगुजर, बूथ प्रमुख राजू पाटील, गोपाल सोनवणे, संजय चौधरी, सुनील पाटील, ताराचंद चव्हाण तसेच गटातील इतर बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख तसेच पदाधिकारी यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version