Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ट्रॅक्टर व कारच्या अपघातात चार तरूणांचा मृत्यू

चंद्रपूर । बर्थ-डे साजरा करून घरी परतणार्‍या मित्रांची कार ट्रॅक्टरवर धडकल्याने झालेल्या अपघातात चौघा तरूणांचा अपघाती मृत्यू झाला आहे.

मूल येथील योग गोगरी या तरुणाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सर्व मित्र हॉटेलमध्ये गेले होते. चंद्रपुर रोडवरील एका हॉटेलमध्ये बर्थडे सेलिब्रेशन केल्यानंतर रात्री उशिरा सर्व जण घरी येण्यासाठी निघाले. चंद्रपूर-मूल मार्गावरील अजयपूर भागातून जाताना एक ट्रॅक्टर अचानक शेतातून मुख्य मार्गावर आल्याने वेगात असलेली गाडी ट्रॅक्टरवर धडकली.

या मोहम्मद अमन (२३); अपघातात दर्शना उधवाणी (२५), प्रगती निमगडे (२४), आणि स्मित पटेल (२५) या चौघांना प्राण गमवावे लागले. तर वाढदिवस असणारा योग गोगरी (२३) हा अपघातात जखमी झाला आहे.

Exit mobile version