Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवस्मारकात चंद्रकांत पाटलांनी भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध करणार : नवाब मलिक

4Nawab Malik 14

मुंबई (वृत्तसंस्था) अरबी समुद्रातील नियोजित शिवस्मारकात चंद्रकांत पाटलांनी पैसे खाल्ल्याचे सिद्ध करणार, असल्याचे खळबळ उडवून देणारे विधान राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी केले आहे. मी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करणार आहे. आम्ही काम थांबवणार नाहीत पण भ्रष्टाचार झालाय तो उघड करू असे मलिक म्हणाले.

 

मलिक बोलतांना म्हणाले की, शिवस्मारकाचे आम्ही काम थांबवणार नाहीत. पण भ्रष्टाचार झालाय तो उघड करू. मी आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी कागदपत्रांच्या आधारे हे समोर आणले होते. चंद्रकांत पाटील यांनी शिवस्मारकात पैसे खाल्ल्याचे सिद्ध करून दाखवू असे मलिक म्हणाले. तर सरकारला या प्रकल्पाची चौकशी करायची असेल तर ती रेंगाळत न ठेवता तातडीने करा, असे आव्हानही चंद्रकांत पाटील यांनी सरकारला दिले.

Exit mobile version