Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आता अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा ! : चंद्रकांत पाटील

मुंबई प्रतिनिधी । अनिल देशमुख यांच्यावरील सीबीआय चौकशीचे स्वागत करतांना आता अनिल परब यांची देखील याच प्रकारची चौकशी करावी अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी केले. तर काही जण जात्यात असले तर काही सुपात असल्याची सूचक प्रतिक्रिया देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निवासस्थान आणि कार्यालयांवर सीबीआयने रात्री उशीरा छापे मारले असून त्यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल झाले आहे. यानंतर आज सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

पाटील म्हणाले की, आधी म्हटले जात असे की, या जन्मातील पुढच्या जन्मात भोगावे लागते. मात्र आता येथेच करायचे असून येथेच भोगायचे आहे. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे याच्या माध्यमातून वसुली सुरू केली होती हे स्पष्ट झाले असून वाझेंनी याबाबत लेखी जबाब दिला आहे. तर, याच प्रकरणात शिवसेनेच मंत्री अनिल परब यांची देखील सीबीआयने चौकशी करावी अशी मागणी देखील चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

Exit mobile version