Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उद्या ग.स ची सभा वादळी ठरण्याची शक्यता

download 3 1

जळगाव, प्रतिनिधी | ग.स.सोसाटीची वार्षिक सर्वसाधरण सभा रविवार दि.२५ रोजी दुपारी १२.३० वाजता नूतन मराठा महाविद्यालयाच्या आवारात होणार आहे. या सभेत १ ते १३ विषय पटलावर असून संस्थेचे सभासद योगेश सनेर, रावसाहेब पाटील यांचे सभासदत्व रद्द करण्याचा विषय ठेवण्यात आला आहे.

दरम्यान सहकार गटातून लोकसहकार गटाचे निर्मिती करुन उभी फूट पाडण्यात आली आहे. त्यामुळे दोन गट तयार झाले असून ग.स.सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधरण सभेत सहकार गटाने बहिष्काराचा पवित्रा घेतल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सर्वसाधरण सभा गाजण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ग. स. सोसयटीच्या १०९ वर्षांच्या इतिहासात प्रथमच सन २०१८-१९ या वर्षाचा वार्षिक अहवाल साप्ताहितामध्ये प्रसिध्द करुन छपाईवर होणार्‍या खर्चात ११ लाख रुपयांची बचत केली आहे. अशी माहिती लोकसहकार गटाचे अध्यक्ष विलास नेरकर यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी गटनेते तुकाराम बोरोले, ग.स.अध्यक्ष मनोज पाटील, उपाध्यक्ष भानुदास भदाणे, विश्‍वास सूर्यवंशी, अनिल गायकवाड पाटील, सुभाष जाधव, सुनील पाटील, नथ्थू पाटील, सुनील अमृत पाटील, यशवंत सपकाळे, ज्ञानेश्‍वर सोनवणे, संजय पाटील, दिलीप चांगरे, संजय ठाकरे, सुभाष पाटील आदी उपस्थित होते.

Exit mobile version