Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यात येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता

rain

मुंबई (वृत्तसंस्था) पावसाने मुंबईसह उपनगरांमध्ये सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. दरम्यान, येत्या ४८ तासांत मुंबई, कोकणसह राज्यात मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान विभागाने वर्तविल्या अंदाजानुसार मुंबई, कोकणसह महाराष्ट्रात जोरदार मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाणीटंचाईग्रस्त मराठवाड्यात चांगला पाऊस झाला आहे. नांदेडमधील धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे येथील पाण्याचा मोठा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. परभणी, हिंगोली, गोंदिया येथेही चांगला पाऊस झाला आहे.

Exit mobile version