Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आव्हाणे शिवारात वाळूमाफियांकडून शेतकऱ्याला मारहाण

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील आव्हाणे शिवारातील गिरणा नदी पात्रातून वाळू उपसा करून शेतातून ट्रक्टर जाण्यास मज्जाव करणाऱ्या शेतकऱ्याला वाळूमाफियांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली. वेळीच ग्रामस्थांनी धाव घेतल्याने ट्रक्टर चालकांनी नदीपात्रात ट्रॅक्टर सोडून पसार झाले आहे.

या मारहाणीत मनोहर चौधरी रा. आव्हाणे ता.जि.जळगाव असे जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, मनोहर चौधरी यांचे गिरणा नदी पात्राच्या काठवर शेत आहे. वाळू माफिया हे गिरणा नदीतून वाळूचा उपसा करून त्यांच्या शेतातून ट्रक्टर व डंपर नेत होते. यामुळे त्यांच्या शेतात रस्ता तयार होत होत. याबाबत शेतकरी मनोहर चौधरी यांनी शेतातून वाहनांना जाण्यास मनाई केली. याबाबत शेतकरी आणि वाळूमाफिया यांच्या वाद झाला. यात शेतकऱ्याला वाळूमाफीयांनी बेदम मारहाण केली. त्यात ते बेशुध्द झाले. हा प्रकार झाल्यानंतर नातेवाईकांसह आव्हाणे गावातील नागरीकांनी धाव घेतली. नागरीकांना पाहून वाळूमाफियांनी ट्रक्टर सोडून पसार झाले होते. याबाबात जळगाव तहसीलदारांना माहिती देण्यात आली. तहसीलदार व पोलीस प्रशासन नदीपत्रात झाले असून पुढील कारवाईचे काम सुरू आहे.

गेल्या  अनेक दिवसांपासून महसूल विभागाने अनेक पथक तयार करून वाळूची अवैध वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतू वाळूमाफीया महसूल प्रशासनाला न जुमानता वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणावर करत आहे.

 

Exit mobile version