Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गिरणा धरणातून सुटले आवर्तन !

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गिरणा धरणातून पाण्याचे आवर्तन सुटले असून ते यंदाचे शेवटचे आवर्तन असेल असे पाटबंधारे खात्यातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

जून महिना अर्धा उलटून गेला असला तरी देखील पावसाचे आगमन झाले असून जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई भासू लागली आहे. या पार्श्‍वभूमिवर, गिरणा धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. या अनुषंगाने काल सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास गिरणा धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. या हंगामातील हे पाचवे आवर्तन असून ते यंदाचे शेवटचे आवर्तन असणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे हेमंत पाटील यांनी दिली आहे.

गिरणा धरणाच्या या आवर्तनामुळे गिरणा नदीवर अवलंबून असणार्‍या नागरिकांसह शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. लवकरच आवर्तनाचे पाणी हे कानळदा गावापर्यंत जाऊन पोहचणार आहे. तर नदीपात्रात पाणी येणार असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version