तितूर व डोंगरी नदीच्या जलपातळीत वाढ; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

चाळीसगाव, प्रतिनिधी | काही दिवसांपूर्वीच्या अतिवृष्टीने झालेल्या हानीचे आघात कायम असतांनाच रात्रीपासूनच्या संततधार पावसामुळे तितूर आणि डोंगरी नदीच्या जल पातळींमध्ये वाढ झाल्याने प्रशासनाने काठावर राहणार्‍या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालेले असताना रिपरिप पाऊस हे सारूच आहेत. परिणामी तितूर व डोंगरी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. तालुक्यात ३० ऑगस्ट रोजी झालेल्या ढगफुटीमुळे पुरात अनेकांचे जनावरे व घरे वाहून गेल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र अनेक सेवाभावी संस्था ह्या पुढे आल्याने माणूसकीचा दर्शन त्यांनी घडविले आहे. संपूर्ण राज्यातून पूरग्रस्त भागाला मदत पोहोचवली जात आहेत. या नैसर्गिक आपत्तीत जनावरे, घरे व पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहेत. त्यात पंचनामे संत गतीने सुरू आहेत. परिणामी शासकीय मदत मिळण्यात विलंब होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अशा भयावह काळातून परिस्थिती कुठेतरी पुर्व पदावर येत असताना रिपरिप पाऊसाने डोके वर काढले आहेत. सुरू असलेल्या संततधार पाऊसामुळे तितूर व डोंगरी नदीच्या पाण्याची पातळीत अचानक वाढ झालेली आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दरम्यान ग्रामीण भागात ज्यांचे घरे पुरामुळे वाहून गेली आहेत. अशांना तात्पुरती जिल्हा परिषद शाळेत राहण्याची व्यवस्था आपण केली असल्याची माहिती लाईव्ह ट्रेंड्स न्युजशी संवाद साधताना तहसीलदार अमोल मोरे यांनी दिली आहे. त्याचबरोबर चाळीसगाव शहर आणि तालुक्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहेत.

Protected Content