Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे ठार

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पाटणादेवी चौफुलीजवळ भरधाव वेगाने धावणार्‍या अज्ञात वाहनाने कारला दिलेल्या धडकेत दोन जण ठार झाले असून तीन जखमी झाले आहेत.

जुल्फिकार खान अलमास खान पठाण (वय ४२, रा. शहादा) हे त्यांचे सासरे आबिद खान अहमद खान पठाण, सासू रुखसाना आबिदखान पठाण (वय ५५), तहसीब रफिक शेख (वय २५) व शेख शब्बीर शेख जलदिश (रा.खेतिया) हे सर्वजण शहादा येथून सोमवारी पहाटे २ वाजता कारने (एम.पी.४६ सी.ओ.९०१) औरंगाबाद हायकोर्टात तारखेला जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान, पाटणादेवी चौफुलीजवळ त्यांच्या कारला अज्ञात वाहनाने धडक दिली.

या अपघातात आबिद खान अहमद खान पठाण (वय ६२) व शेख शब्बीर शेख जलदीश (वय ६५) हे मयत झाले असून तिघे जखमी झाले आहेत. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक वाहनासह पसार झाला. याप्रकरणी जुल्फिकार खान अलमास खान पठाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.

Exit mobile version