Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कुंपणाची भिंत कोसळून तीन मजूर ठार

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील एच.एच. पटेल या तंबाकूच्या कंपनीतील कंपाऊंडची भिंत कोसळून तीन मजूर ठार झाल्याची दुर्घटना घडली आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, चाळीसगाव येथे एच.एच. पटेल ही तंबाकू निर्मित करणारी कंपनी आहे. या कंपनीत काल रात्री दुर्घटना घडली. या कंपनीत नाली सफाईचे काम सुरू होते. याच ब्रेकर मशिनने काम सुरू असतांना अचानक कंपाऊंडची भिंत कोसळून मजूर दबले गेले. यात मोहंमद अकील साकीर आली, विनीत कुमार जमुनाप्रसाद चौरसिया आणि लतीफ रहीम बक्स हे तीन मजूर मृत्यूमुखी पडले. या दुर्घटनेत एक मजूर जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या संदर्भात रात्री उशीरा पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. मयत तिन्ही कामगार हे उत्तरप्रदेशातील होते.

Exit mobile version