Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अवैध विदेशी मद्य साठ्यावर छापा; एक कोटींचा मुद्देमाल जप्त

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी | तालुक्यातील सांगवी शिवारात राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या पथकाने केलेल्या कारवाईत अवैध विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला असून रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली. यात तब्बल एक कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

चाळीसगाव तालुक्यातून लाखो रुपयांच्या विदेशी मद्याच्या साठ्याची वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्या अनुषंगाने सांगवी शिवारात बोढरे फाट्याजवळ पथकाने शिरा (एमपी ०९ एचजी ९३५४) क्रमांकाचा एक ट्रक त्याठिकाणी आला. ट्रकची तपासणी केली असता त्यात लाखो रुपयांचा विदेशी मद्याचा साठा आढळून आला. यात त्यात गोवा राज्यात निर्मित व विक्रीस परवानगी असलेली रॉयल ब्लू मॉल्ट व्हिस्कीच्या १८० मिलीलीटरच्या ६० हजार ४८० बाटल्या (१२६० बॉक्स), मद्य ठेवण्यासाठी असलेले ६ प्लायवूडचे खोके, चालकाचा मोबाईल फोन तसेच, टाटा कंपनीचा (एमपी ०९ एचजी ९३५४) क्रमांकाचा ट्रकचा समावेश आहे. हा संपूर्ण मुद्देमाल एक कोटी तीन लाख रूपयांचा असून तो जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई विभागीय आयुक्त अर्जुन ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे सी.एच. पाटील, दुय्यम निरिक्षक एस.एस. रावते, ए.डी. पाटील आणि जवान गोकुळ शिंदे, विठ्ठल हाके, भाऊसाहेब घुले, युवराज रतवेकर यांच्या पथकाने केली. त्यांना के.डी. पाटील, सी.आर. दांगट, आर.टी. खैरे, सी.आर. शिंदे, महेंद्र बोरसे, अण्णा बहिरम, संजय सोनवणे आणि शशिकांत पाटील यांनी मदत केली.

Exit mobile version