Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शहीद जवान यश देशमुख यांना श्रद्धांजली

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील डॉ. सुनील राजपूत मित्र मंडळ व शहीद जवान स्मृती वंदन समिती यांच्या वतीने हुतात्मा जवान यश देशमुख यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.

प्रारंभी शहीद जवान यश देशमुख यांच्या प्रतिमेला निवृत्त सैनिक विकास पाटील, आबासाहेब गरुड व धुळे येथील जवान चंदू चव्हाण यांनी माल्यार्पण करून वंदन केले. या वेळी निवृत्त सैनिक आबासाहेब गरुड, जवान चंदू चव्हाण, जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, सुभाष जैन, पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड, समता दलाचे अध्यक्ष धर्मभूषण बागुल, संभाजी सेनेचे अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ आदींनी मनोगत व्यक्त केले.

या श्रध्दांजली कार्यक्रमास प्रशांत देशमुख, दिनेश पाटील, प्रमोद पाटील, नगरसेवक रामचंद्र जाधव, भगवान पाटील, दीपक पाटील, सूर्यकांत ठाकूर, घृष्णेश्‍वर पाटील, संजय पाटील, रमेश चव्हाण, वर्धमान धाडीवाल, सुचित्रा पाटील, नगरसेविका विजया पवार, अनिता शर्मा, सुवर्णा राजपूत, सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे, भरत मेहता, संजय चौधरी, बाबुलाल पवार आदी मान्यवरांसह नागरिक उपस्थित होते.

एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी परेड सादर करुन शहीद जवानाला सुमनांजली अर्पण केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. सुनील राजपूत, डॉ संतोष मालपुरे, अनिल मालपुरे, प्रवीण जाधव, प्रीतेश कटारिया, प्रमोद गुळेचा, संदीप जैन, स्वप्निल जाधव, महेंद्र बंडगर, मुकेश पाटील, विनोद शेवरे, स्वप्निल राखुंडे, स्वप्नील कोतकर आदींचे सहकार्य लाभले.

Exit mobile version