Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

माजी नगरसेवकावर हल्ला करणारे तिघे अटकेत

चाळीसगाव प्रतिनिधी । माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर धारदार कटरने प्राणघातक हल्ला करणार्‍या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे की, शहरातील वीर सावरकर चौकात ८ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी औरंगाबाद येथे जाऊन पोलिसांनी त्यांचे जाबजबाब घेतल्यानंतर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात जगदीश महाजन, मुलगा विशाल जगदीश महाजन आणि संजय घटी अशा तिघांवर कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास एपीआय सचिन कापडणे तपास करीत आहेत.

Exit mobile version