Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जुगार अड्डयावर छापा; सहा जणांवर कारवाई

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील ओझर येथे सुरू असणार्‍या जुगार अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी सहा जणांवर कारवाई केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील ओझर येथील भिलाटी भागातील कालिका देवीच्या मंदिराजवळ जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांना शनिवार, ८ रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास मिळाली. या अनुषंगाने सपोनि विशाल टकले, सपोनि सचिन कापडणीस, संदीप पाटील, मुकेश पाटील, राकेश पाटील, अमोल भोरसे, भुषण पाटील, प्रविण परदेशी व पवन पाटील आदींनी ९:३० वाजेच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकून २४ हजार ६०० रूपयांचे मुद्देमाल जप्त केले.

यावेळी ६ जणांवर कारवाई करण्यात आली. यात अंकुश यशवंत मंजाळ (२४), दादाभाऊ धुडकू जाधव (२६), आण्णा दादासाहेब गायकवाड (१९), वामन बाजीराव बोरसे (१९), गिरीश प्रकाश भोई (३५) सर्व रा. ओझर व जगन सल्लू घुमर(२९) रा. टाकळी प्र.चा ता. चाळीसगाव आदींवर कारवाई करण्यात आली. तर, पोलिसांनी केलेल्या अंगझडतीतून दुचाकीसह (क्र. एम.एच.१९ अ-५४६७) एकूण २४ हजार ६०० रूपये जप्त करण्यात आले आहे. शरद मांगो पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस स्थानकात वरील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोना/१००२ राकेश पाटील हे करीत आहेत.

Exit mobile version