Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगावात राष्ट्रवादीतर्फे राजीव देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Chalisgaon umedwari news

चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार राजीव देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज आज (दि.3) दुपारी तहसील कार्यालयात दाखल केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार माजी आमदार राजीवदादा देशमुख यांनी चाळीसगाव तहसील कार्यालयात प्रांत सातळकर यांच्याकडे दाखल केला. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शशिकांत साळुंखे, दिनेश पाटील, शहराध्यक्ष शाम देशमुख, महानंदाचे संचालक प्रमोद पाटील, देशमुखवाडीचे माजी सरपंच दिलीप देशमुख, माजी नगरसेवक प्रदीप निकम आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version