Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगावातील दोन नंबरच्या धंद्यांना लोकप्रतिनिधींचा वरदहस्त-खडसे (व्हिडीओ )

चाळीसगाव chalisgaon जीवन चव्हाण । चाळीसगावात गुटखा व अवैध दारूसोबत अनेक दोन नंबरचे धंदे असून याला लोकप्रतिनिधींचा वरदहस्त आहे. हे धंदे बंद केल्यास अनेक जण थंड होतील असा घणाघात आज माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी केले. ते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आयोजीत परिवार संवाद यात्रेत बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील jayant patil यांची राज्यव्यापी परिवार संवाद यात्रा आज दुपारी चाळीसगावात आली. याप्रसंगी पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे eknath khadse यांनी चाळीसगावातील दोन नंबरच्या धंद्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, चाळीसगावात अवैध गुटखा, अवैध दारू आदींसह अनेक दोन नंबरचे धंदे जोरात सुरू असून याला लोकप्रतिनिधींचे पाठबळ मिळत आहे. पोलीस यावर कारवाई करत असून कठोर कारवाई झाल्यास अनेक जण थंड पडणार असल्याचे प्रतिपादन खडसे यांनी केले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ncp ग्रामपंचायत निवडणुकीत चांगले यश मिळाले असून आगामी निवडणुकांमध्ये याला कायम ठेवायचे असल्यास राज्य सरकारने केलेली कामे ही जनतेपर्यंत पोहचवण्याचे आवाहन त्यांनी केले. संघटनाच्या बळावरच आपला पक्ष प्रगतीपथावरून जाणार असल्याचा आशावा देखील त्यांनी व्यक्त केला.

खालील व्हिडीओत पहा नाथाभाऊ नेमके काय म्हणालेत ते ?

Exit mobile version