Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगावात गोळीबार; एक जण जखमी

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील घाट रोड परिसरातील हुडको परिसरात सायंकाळी झालेल्या गोळीबारात एक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

चाळीसगाव येथील घाट रोड परिसरातील हुडको भागात सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास अज्ञात दोन व्यक्तींनी यामाहा कंपनीच्या गाडीवर येऊन अचानक गोळीबार केला. यात तीन गोळ्या झाडल्या गेल्या असून एक गोळी हवेत फायर झाली तर दुसरी जमिनीवर फायर झाले असून एक गोळी शेख जुगर शेख वसीम या तरुणास मांडीवर लागल्याचे वृत्त असून सदर जखमी करून शहरातील देवरे हॉस्पिटल येथे उपचार घेत असल्याचे समजते.

गोळीबाराची पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तात्काळ चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड व त्यांच्या पथकाने घटनास्थळावर जाऊन पाहणी करून पुढील कारवाईसाठी हालचाली सुरू केल्या असल्याचे वृत्त आहे भरदिवसा चाळीसगाव शहरातील गजबजलेल्या वस्तीत घडलेल्या या प्रकाराने शहरातील वातावरण अचानक भितीदायक झाले असल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version