Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगावात मशाल मोर्चा काढणार्‍यांवर गुन्हा दाखल

FIR

चाळीसगाव प्रतिनिधी । येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या समर्थनार्थ शहरातून मशाल मोर्चा काढणार्‍या ३१ जणांच्या विरूध्द रात्री उशीरा गुन्हा Fir दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, आमदार मंगेश चव्हाण यांच्या अटकेच्या निषेधार्थ चाळीसगाव येथील विश्रामगृह ते तहसील कार्यालय पर्यंत शनिवारी सायंकाळी भाजपातर्फे मशाल पेटवून मोर्चा काढण्यात आला.

चाळीसगाव तालुक्यातील सात हजार शेतकरी बांधवांच्या शेतीपंपाचे वीज कनेक्शन महावितरण कंपनीकडून खंडित करण्यात आल्याने आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकर्‍यांना सोबत घेऊन कंपनीच्या अधिकार्‍यांनासोबत चर्चेदरम्यान चकमक झाली. त्यामुळे आमदारासह शेतकर्‍यांना एमआयडीसी पोलीसांनी अटक केलेली आहे. त्यांच्यासह इतरांना न्यायालयाने शनिवारी ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, आमदार मंगेश चव्हाण यांच्या अटकेच्या निषेधार्थ चाळीसगावात शनिवार दि.२७ मार्च रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास येथील विश्रामगृह ते तहसील कार्यालय पर्यंत भाजपातर्फे मशाल मोर्चा काढण्यात आला. या माध्यमातून कोरोनाची साथ सुरू असताना नियमांची पायमल्ली केल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते एकूण ३१ जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा Fir दाखल करण्यात आले आहे.

यात भाजपाचे शहराध्यक्ष नगरसेवक घृष्णेश्‍वर पाटील, नगरसेवक बापू मोतीलाल अहिरे (न.पा.चाळीसगाव), विश्‍वास दगडू चव्हाण, दिनेश बोरसे (बहाळ), जिल्हा उपाध्यक्ष के.जी.साळूंखे, नगरसेवक शेख चिरागोद्दीन शेख रफियोद्धीन, भावेश कोठावदे, सचिन दायमा, सौरभ पाटील, दिपक राजपूत (जामटी), चंद्रकांत तायडे, दिपक पाटील, संदिप भावसार, संदिप राणा यांच्यासह इतर १० ते १२ अज्ञात व्यक्तींचा समावेश आहे.

या संदर्भात पोहेकॉ/२०५८ गणेश पाटील यांनी फिर्याद दाखल केली असून भादंवि कलम १८८,२६९,२७० बरोबर साथीचे रोग प्रतिबंधक कायदा कलम २,३, व ४ व पो. अधिक्षक कलम ३७(१) नियमांचे उल्लंघन अशा विविध कलमान्वये फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

Exit mobile version