Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ट्रॅक्टरची ट्रॉली पलटली; दोघांचा मृत्यू

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील हिरापूर जवळ मुरूम वाहून नेणार्‍या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली.

याबाबत वृत्त असे की, हिरापुर ता. चाळीसगांव येथील रेल्वे स्थानकाजवळील नांदगांव रस्तावर काही मिनिटांपूर्वी मुरूम भरलेले ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होवुन दोन मजुर दबून ठार झाले असल्याची घटना घडली. येथुन जात असताना खासदार उन्मेश दादा पाटील यांनी तात्काळ अंबुलन्स बोलावून, ग्रामीण पोलिस निरीक्षक यांना तातडीने जेसीबी घेऊन दबलेल्या मजूरांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावयाचे आदेश दिलेत.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतीचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही जण ट्रॉलीखाली दाबले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणी नोंद घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तर, या अपघातातील मृतांची ओळख पटविण्यात येत आहे.

Exit mobile version