चाळीसगाव कृउबा सभापतीपदी राजपूत तर उपसभापतीपदी पाटील बिनविरोध (व्हिडीओ)

chalisgaon kruba samiti nivad

चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव कृउबा समितचे सभापती आणि उपसभापती यांचा कार्यकाळ पुर्ण होण्याआधिच दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर सभापतीपदी सरदारसिंग राजपूत तर उपसभापतीपदी किशोर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव कृउबा समितीचे सभापती रवींद्र पाटील व उपसभापती महेंद्र पाटील यांनी आपला कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच दिलेल्या राजीनाम्यामुळे कृउबा समितीचे रिक्त जागेसाठी आज निवड करण्यात आली. सभापतीपदी सरदारसिंग राजपूत तर उपसभापतीपदी किशोर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी सभापतीपदासाठी राष्ट्रवादी प्रस्तुत पॅनलच्या कल्याण पाटील यांनी व उपसभापती पदासाठी प्रकाश पाटील यांनी दाखल केलेले आपले उमेदवारी अर्ज निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच मागे घेतल्याने या दोघे सदस्यांची बिनविरोध निवड निवडणूक निर्णय अधिकारी श्री बागुल यांनी जाहीर केली आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व संचालक संचालिका उपस्थित होते. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी सभागृहात येऊन दोन्ही नवनिर्वाचित सदस्यांना शुभेच्छा दिल्या.

चाळीसगाव बाजार समितीमध्ये लवकरच शेतकरी बांधवांसाठी 10 रुपयात पूर्ण जेवण देण्याची घोषणा केली असून बाजार समितीला इथून पुढे ज्या ज्या मदतीची आवश्यकता लागेल ही मी निश्चितच लावण्याचा प्रयत्न करून शेतकरी व व्यापारी यांच्यात समन्वय साधून बाजार समितीचा व्यवहार करण्याचा आपला सर्व संचालकांना आग्रह असेल असेही आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी सांगितले. यानंतर नवनिर्वाचित सभापती उपसभापती व आमदार सर्व संचालक मंडळाने बाजार समितीचे संस्थापक रामराव जिभाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केले व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

Protected Content