Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राजमाने येथे बालाजी संस्थानतर्फे युवा नेते मंगेश चव्हाण यांचा सत्कार (व्हिडीओ)

चाळीसगाव प्रतिनिधी । राजमाने गावातील श्री बालाजी महाराज मंदिराच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त युवा नेते मंगेश चव्हाण मित्र परिवारातर्फे मंदिराजवळ असलेल्या सभा मंडपाचे शेड उभारून दिल्याने युवा नेते मंगेश चव्हाण यांचा सत्कार मंदिर संस्थांनातर्फे करण्यात आला.

यानिमित्त 1 ते 5 ऑगस्टपर्यंत सुरू असलेल्या अखंड हरिनाम किर्तन सप्ताहाची सांगता सोमवारी झाली. यावेळी विविध कामासाठी देणगी देणाऱ्या मान्यवारांचे सत्कार करण्यात आले. सप्ताहाची मानाची हंडी फोडण्याचा मान युवा नेते मंगेश चव्हाण व भैय्या साहेब पाटील यांना मिळाला.

गावकऱ्यांनी गावात तमाश्यासाठी पैस गोळा केला होता, मात्र तमाश्या न करता गावात असलेल्या नाल्याचे खोलीकरण करण्याचे ठरवले. ग्रामस्थ व युवा नेते मंगेश चव्हाण मित्र परिवाराच्या मदतीने गावातील नाल्याचे खोलीकरणाचे काम पूर्ण केल्याने मंगेश चव्हाण यांनी गावकऱ्यांचे यावेळी विशेष आभार मानले. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचा लाभ ग्रामस्थानी घेतला. सप्ताह पार पाडण्यासाठी दहिवद, राजमाने, करमुड,धामणगाव या गावातील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

 

Exit mobile version