Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत कोतकर कॉलेज विजयी

chalisgaon kabbaddi

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत के.आर. कोतकर कॉलेजने विजय मिळविला असून यशस्वी झालेल्या टीमला सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

येथील तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात राष्ट्रीय ज्यूनियर कॉलेज आणि के.आर. कोतकर कॉलेज यांच्यात झाली. यात सामान्यात के.आर. कोतकर कॉलेजने विजय मिळविला आहे. यशस्वि झालेल्या प्रविण राजपूत, सीमा माळतकर, प्रा.खुशाल देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी संघास पुढील वाटचालीसाठी मॅनेजींग बोर्डाचे चेअरमन नारायण अग्रवाल, ज्यूनीयर कॉलेज कमीटीचे चेअरमन श्यामलाल कुमावत, क्रीडा समीतीचे चेअरमन क.मा.राजपूत, डॉ.मिलिंद बील्दीकर, उपप्राचार्य बी.आर.येवले, प्रा.संजय सोनवणे, प्रवीण राजपूत यांनी शुभेच्छा दिल्यात.

Exit mobile version