Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील करणार अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी

चाळीसगाव प्रतिनिधी | राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे जिल्हा दौर्‍यावर येत असून ते उद्या अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.

३० आणि ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे चाळीसगाव, पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील ३८ गावांना जबर फटका बसला आहे. यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. तर कन्नड घाटातील वाहतूक अजून देखील सुरळीत झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आधीच नुकसानीची पाहणी केली आहे.

दरम्यान, जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उद्या शनिवारी जिल्हा दौर्‍यावर येत असून ते उद्या सकाळी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करणार असून नुकसान्रस्तांशी संवाद साधणार आहेत. जिल्हा प्रशासनाने त्यांच्या दौर्‍याचा तपशील जाहीर केला आहे.

Exit mobile version