Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगावात रंगला ‘दरबार मेरे साई का’ कार्यक्रम ! ( व्हिडीओ )

darbar mere sai ka

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील मंगेश चव्हाण मित्र परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘दरबार मेरे साई का’ या कार्यक्रमाने उपस्थित हजारो भाविकांना मंत्रमुग्ध केले.

मंगेश चव्हाण मित्र परिवारातर्फे बीड येथील साई कथाकार साई गोपाल देशमुख यांच्या ‘दरबार मेरे साई का’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम साईबाबांच्या जीवनावर आधारित असून देशमुख यांनी आपल्या अमोघ वाणीने उपस्थितांना अक्षरश: मंत्रमुग्ध केले. शहरातील सिताराम पहेलवान मळा, लक्ष्मीनगर येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला हजारो आबलावृध्दांची उपस्थिती होती.

पहा : दरबार मेरे साई का कार्यक्रमाचा व्हिडीओ.

Exit mobile version