Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगावात मोठी कारवाई : गुटख्याचा कंटेनर जप्त

*चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी* | चाळीसगावात ग्रामीण पोलीसांनी आज गुटख्याचा कंटेनर पकडला असून यात सुमारे एक कोटीचा मुद्देमाल असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करणे सुरू आहे.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगावात ग्रामीण पोलीसांनी एका कंटेनवर संशय आल्याने त्याचा पाठलाग करून पकडला. सदर कंटेनरची अधिक तपासणी केली असता मध्ये गच्च गुटखा भरलेला असल्याचे दिसून आले. दरम्यान या कंटनेरमध्ये कदाचित एक कोटीचा गुटखा असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या धडाकेबाज कामगिरीमुळे ग्रामीण पोलीसांचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक होत आहे. तत्पूर्वी (क्र. एच.आर. ३८ एबी ६०९६ ) असे पकडलेल्या गाडीचा नंबर आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करणे सुरू आहेत.

दरम्यान, इतक्या मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त करण्याची ही पहिलीच वेळ असल्याने यामुळे गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान, तीन दिवसांपूर्वीच भुसावळ येथे अशाच प्रकारे मोठी कारवाई करण्यात आली होती. यानंतर चाळीसगावातही कंटेनर जप्त करण्यात आल्यामुळे गुटखा तस्करीची पाळेमुळे तालुक्यात असल्याची चर्चा देखील नव्याने सुरू झाली आहे.

Exit mobile version