Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुचाकीस्वारांकडून बस चालकाला बेदम मारहाण

FIR

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | काही एक कारण नसताना दुचाकी स्वाराने बस चालकाच्या डोक्यात दगड मारून गंभीर दुखापत केल्याची घटना तालुक्यातील न्हावे गावात घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील गणेशपुर येथील बस चालक संजय दत्तात्रय सरोदे (वय-५३) हे चाळीसगाव कडून वाडेगावी तरवाडे-न्हावे मार्गे बसने (क्र. एम.एच.२० बीएल ०३६८) प्रवाशांना घेऊन जात असताना न्हावे गावातील बस स्थानकाजवळ त्यांनी बस हळू केली. मागून एक दुचाकीस्वार आला. आणि बसचा दरवाजा उघडून चालकाच्या डोक्यात दगडाने मारहाण केली. यात चालक संजय सरोदे यांना गंभीर दुखापत झाली. सदर धक्कादायक घटना ३ जानेवारी रोजी दुपारी ४:१५ वाजताच्या सुमारास घडली असून त्यांना लागलीच पुढील औषधोपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आला. दरम्यान प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांच्या जाबजबाबावरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात नामे शरद प्रकाश पाटील रा. तरवाडे ता. चाळीसगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोउपनि कुणाल चव्हाण हे करीत आहे.

Exit mobile version