Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगावात बाबाजी चौकातील ‘जीवघेणा नाला’

nala 40 gaon

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील प्रभाग क्रमांक 17 मधील जय बाबाजी चौकातील नाला 2 ते 3 फुट खोल असून, नाला घाणेने तूंबलेला आहे. नगरसेवकांकडे तक्रार करुन देखील, लक्ष देत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

याबाबत माहिती अशी की, गेल्या 10 ते 15 महिन्यांपासून प्रभागातील जय बाबाजी चौक येथील नाला 2 ते 3 फुट खोल असून, हा नाला गटारिच्या घाण पाण्याने पुर्ण भरला आहे. मात्र हे लहान मुलासाठी जीवघेणा ठरत आहे. ह्या संबंधी प्रभाग नं 17 येथील दोन्ही नगरसेवकांना वारंवार तसेच मुख्याधिकारी यांना तोडी व लेखी स्वरूपात निवेदन दिले असून देखील लक्षच देत नाही आहेत. दरमान्य गेल्याच महिन्यात संभाजी काळे नामक ह्या व्यक्तीचा 3 वर्षाच्या मुलगा या नाल्यात पडला होता. मात्र तात्काळ नागरिकांच्या लक्षात आल्याने मुलाच्या वेळीच प्राण वाचले. अन्यथा खुप मोठा अनर्थ घडला असता. अजूनही नगरपालिकेच्या ही बाब लक्षात येत नाही आहे. अशा संतापजनक भावना नागरिक व्यक्त करत आहेत. यावर नगरपालिकेने त्वरित लक्ष देण्याची गरज आहे.

Exit mobile version