Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगाव येथे सोलर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन

solar

 

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील बी.पी. आर्टस्, एसएमए सायन्स, के.के.सी. कॉमर्स महाविद्यालय व के.आर. कोतकर ज्यूनीयर कॉलेजमध्ये १० केव्हीए क्षमतेच्या सोलर ऊर्जा प्रकल्पाचा उदघाटन समारंभ नुकताच खासदार उन्मेष पाटील यांच्याहस्ते झाला आहे.

समारंभाचे अध्यक्ष संस्थेचे मॅनिंजिंग बोर्डाचे चेअरमन नारायण अग्रवाल होते. उमंग समाज शिल्पी परीवाराच्या अध्यक्षा संपदा पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, डॉ.एम.बी. पाटील, श्यामलाल कुमावत, क.मा.राजपूत, मु.रा.अमृतकार, डॉ.सुनील राजपूत, भाजपा तालुकाध्यक्ष के.बी.साळुंखे, ज.मो.अग्रवाल, योगेश अग्रवाल, अशोक वाणी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.डॉ. मिलिंद बिल्दीकर यांनी केले. अध्यक्षीय मनोगतात नारायण म्हणाले की, गेल्या काही वर्षांमध्ये, विजेचे दर कमालीचे वाढले आहेत. सौरऊर्जा निर्माण केल्यास विजेच्या बिलात बचत होईल, आपल्या संस्थेचा माजी विद्यार्थी खासदार झाल्याचा खूप आनंद झाला, उन्मेश खूप आभ्यासू असून ते नक्कीच जिल्ह्याचा विकास करतील असे सांगून त्यांना भावी वाटचालीसाठी खा. पाटिल यांना शुभेच्छा दिला आहेत.
चाळीसगाव महाविद्यालयाने अपारंपरिक ऊर्जा श्रोताचा वापर करण्यासाठी सौर प्रकल्पाची उभारणी केली ही बाब खरोखर समाजापुढे आदर्श निर्माण करणारी आहे. या अपारंपरिक ऊर्जा श्रोतांच्या माध्यमातून घरोघरी उर्जा निर्मीती केली जावून त्यातून अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न जाता, रोजगार निर्माती करा. तसेच महाविद्यालयाने व्यावसायिक अभ्यासक्रमांवर भर देऊन तरुणांना रोजगारभिमुक करावे. तालूक्यातील इतर शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना हा प्रकल्प आवर्जून दाखवा. यासंदर्भात समजून सांगा जेणेकरून ग्रामीण भागात सौर ऊर्जेचे महत्व समजेल. महाविद्यालयास डॉ.मिलींद बिल्दीकर यांच्या रूपाने संगणक, माहीती व तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडीत व आभ्यासू प्राचार्य मिळाले. त्यामूळे नारायण नेत्रूत्वाखाली महाविद्यालयाची व पर्यायाने संस्थेची प्रगती होईल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाविद्यालयाच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन खासदार पाटील यांनी केले आहे. तसेच उन्मेष पाटील हे जळगाव लोकसभा मतदार संघातून खासदार निवडून आल्यामुळे त्यांचा चाळीसगाव एजुकेशन संस्थेचे मॅनिंजिंग बोर्ड चेअरमन नारायण अग्रवाल यांनी सपत्नीक सत्कार केला. यावेळी संपदा पाटील, के.बी साळुंखे, संचालक योगेश अग्रवाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. रवींद्र पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार उपप्राचार्य अजय काटे यांनी मानले

Exit mobile version