Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगाव येथून मोटारसायकल चोरणाऱ्यास अटक

123456 2

 

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातून मोटारसायकल चोरी करण्या-यास पोलिसांनी काल (दि.२८) मोटारसायकलसह औरंगाबाद येथून ताब्यात घेतले आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील खरजई रोडवरील पेट्रोल पंपाजवळुन पिंपरखेड येथील देविदास थोरात यांची मोटारसायकल सीडी डिलक्स (क्र.एमएच १९ बीके १३९८) ही दि १ जून रोजी चोरीला गेली होती. तेव्हापासुन पोलीस चोरट्याच्या शोधात होते. अखेर काल औरंगाबाद येथील सीटी चौक पोलिसांनी मंगेश हरी गौतम (२०) रा. देवगाव रंगारी, ता. कन्नड जि. औरंगाबाद यास चोरीच्या मोटारसायकलसह ताब्यात घेतले होते. येथील शहर पो.नि. विजय ठाकुरवाड, उपनिरीक्षक राजेश घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप तहसिलदार, विनोद भोई, राहुल पाटील, पो.कॉ. प्रविण सपकाळे यांनी आरोपीस मोटारसायकलसह ताब्यात घेतले आहे. त्याचेकडुन आणखी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Exit mobile version