Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगाव येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

chalisagaon unmesh patil

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील वसुंधरा फाउंडेशनतर्फे दान पर्व २०१९ अंतर्गत नगरपालिका मराठी व उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी, मराठी माध्यमाच्या शाळा क्रमांक १, ४, ७ ,१६ आणि उर्दू माध्यमाच्या मुलांची शाळा क्रमांक १ ,२ ,३ व मुलींची शाळा क्रमांक १,२ अश्या ९ शाळेतील सुमारे ७५० विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४ वह्या, पेन, पेन्सिल, रबर, पट्टी व शार्पनर असे शैक्षणिक साहित्य खासदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याचबरोबर, इतर शहरातील अनेक नागरिकांनी या उपक्रमासाठी आर्थिक सहाय्य केले. या सर्व दात्यांच्या सहाय्याने या विद्यार्थ्यांना शिक्षणाची तृष्णा भागवण्यासाठी मदत होईल असे प्रतिपादन वसुंधरा फाउंडेशनचे संस्थापक सचिन पवार यांनी केले.
यावेळी सुनील भामरे, देवेन पाटील, संजय पवार, गजानन मोरे, आशुतोष खैरनार, मच्छिंन्द्र वाघ, शेख सरदार, समकीत छाजेड व मनोज पाटील तसेच शाळेचे शिक्षकवृंद निवृत्ती उंबरकर, कैलास पाटील, ज्ञानेश सांळुंखे, राखी ठोके, दिनेश पचलुरे, अनिल पेटे, चंद्रभागा भालेराव, प्रतिभा पाटील, नितीन राठोड, अनिस अहमद, अब्दुल गनी, एजाज अहमद, शफीयोद्दीन इमरान खान, गफ्फार खान, अब्दुल रहमान, नाजनीन मॅडम आदी उपस्थित होते.

Exit mobile version