Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगाव के.आर.कोतकर कॉलेजच्या हॅण्डबॉल संघांचे यश

c6cc9b00 c1aa 4d2c 8a84 fafc095fbe94

 

चाळीसगाव (वृत्तसंस्था) क्रीडा व युवक सेवा संचालनय महाराष्ट्र सरकार, पुणे व नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरू गोविंद सिंग स्कूल नाशिक येथे आयोजित विभागीय हॅण्डबॉल स्पर्धेमध्ये के.आर.कोतकर ज्युनियर कॉलेज,चाळीसगावचा 19 वर्षा खालील (मुले व मुली) दोन्ही संघ सलग तिसऱ्या वर्षी विजयी होत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रही ठरला आहे.

 

एक छोटेखानी कार्यक्रम मध्ये खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे क्रीडा समिती चे प्रमुख क.मा.राजपुत सर,प्राचार्य मा. डॉ. मिलींद बिल्दीकर, सिनियर कॉलेजचे उपप्राचार्य मा.डॉ. प्रकाश बाविस्कर, उपप्राचार्य मा.प्रा.अजय काटे,ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य मा.प्रा. बाळकृष्ण येवले, कार्यालय प्रमुख हिलाल पवार, सिनिअर कॉलेजचे क्रीडा संचालक प्रा संजय सोनवणे, ज्युनिअर कॉलेजचे क्रीडा संचालक प्रा.खुशाल देशमुख व दिलीप शेटे यांनी अभिनंदन केले आहे. पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन नारायण अग्रवाल, ज्युनिअर कॉलेज कमिटीचे चेअरमन नानाभाऊ कुमावत, क्रीडा समिती सचिव प्रवीण राजपूत व सर्व क्रीडा शिक्षक व सन्माननीय संचालक मंडळ यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version