Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चैतन्य तांडा येथून एकाची दुचाकी लांबविली

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील चैतन्य तांडा येथे घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना उघडकीला आली. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, चंद्रकांत अर्जून पाटील (वय-४५) रा. चैतन्य तांडा ता. चाळीसगाव हे वरील ठिकाणी परिवारासह वास्तव्यास असून एमआयडीसी येथे खासगी नोकरीला आहे.  दरम्यान मुलगा दिपक चंद्रकांत पाटील हा मंगळवार रोजी भारत वायरोप कंपनीत कामाला गेला. काम आटोपल्यानंतर तो रात्री ११.३० वाजता घरी आला. तत्पूर्वी त्याने दुचाकी (क्र. एम.एच.१९ बीएस ३६९३) हि घरासमोरील कंपाऊंडमध्ये लावली. सकाळी ६:३० वाजता उठल्यानंतर बघितली तर दुचाकी मुळ ठिकाणी दिसून आली नाही. त्यावर मुलाने परिसरात शोधाशोध केली असता मिळून आले नाही. म्हणून २५ हजार रुपये किंमतीची स्प्लेंडर कंपनीची दुचाकी अज्ञात इसमाने चोरून नेल्याचे स्पष्ट झाल्याने चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात चंद्रकांत अर्जून पाटील यांच्या फिर्यादीवरून भादवी कलम- ३७९ प्रमाणे अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.

Exit mobile version